आता सचिन पिळगावकर घेऊन आलेत ‘दिमाग मे भुसा, मैने उसको लुटा’

टीम महाराष्ट्र देशा : ‘मुंबई अँथम’च्या नावाखाली ‘माय मुंबई’चं अत्यंत आक्षेपार्ह वर्णन केल्यानं टीकेचा भडिमार सोसावा लागलेले प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांचं एक नवं गाणं यू-ट्युबवर दाखल झालं आहे. त्यात ‘महागुरूं’चा नृत्याविष्कार पाहायला मिळत नसला, तरी त्यांनी गायलेल्या गाण्याचे शब्द ऐकून ‘दिमाग का भुसा’ होऊ शकतो.

‘दिमाग मे भुसा, मैने उसको लुटा, उसने दिया ठुसा, आय डॉन्ट केअर…’ असं गाणं एम अकिल अन्सारी यांनी लिहिलंय. ते सचिन यांनी गायलं आहे. हे गाणं सुरू असताना, पडद्यावर जे काही घडतं, ते अनाकलनीयच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन पिळगांवकरांचे चाहते नाराज होण्याचीच शक्यता आहे. एकापेक्षा एक भारी सिनेमे देणाऱ्या सचिन यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारानं धरलेला हा ‘ट्रॅक’ मराठी रसिकांना अजिबातच रुचणारा नाही.

कथप्पाने घेतला ‘ढींच्याक पूजाच्या’ व्हिडीओचा बळी

दिल चोरी साड्डा हो गया…हनी सिंग चं नवीन गाणं हिट