…तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील

…तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील

dilip walse patil

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे आयोजित कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना गृहमंत्र्यांनी आर्यन खान(Aryan Khan) प्रकरणावर भाष्य केले.

यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. परंतु,न्यायालयाने आर्यन खानला ‘क्लीनचिट’ दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेने हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल,’असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मी कोणत्या पक्षाचे नाव घेणार नाही, परंतु आर्यन खानच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थांनी ‘वेगळ्याच प्रकार’ची कामगिरी केली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करावी लागेल. केंद्रीय तपास संस्थांचा वापर चुकीच्या पद्धतीने होतो आहे. विदेशी मद्याला करसवलत दिल्याच्या विषयावर बोलण्यास मात्र त्यांनी हा आपला विषय नाही, असे सांगत नकार दिला, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारेच आता जाहीरपणे पुरावे नसल्याचे सांगत आहेत आणि आरोप करणारे आता आपली भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. म्हणजेच अनिल देशमुख यांच्यावरील आरोप पुराव्याशिवाय केले होते, हे स्पष्ट होते असेही पाटील यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या