सर्वाधिक उत्पन्न असलेल्या आमदारांच्या यादीत बार्शीचे आमदार दिलीप सोपल देशात सहावे

टीम महाराष्ट्र देशा : देशातील आमदारांच्या वार्षिक उत्पन्नानुसार यादी करण्यात आली आहे, यामध्ये सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या टॉप 20 मध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे, यामध्ये भाजप आमदार मंगलप्रभात लोढा 2 क्रमांकावर आहेत, तर बार्शीचे आ दिलीप सोपल हे सहाव्या स्थानी आहेत.

देशभरातील 3 हजार 145 आमदारांची त्यांच्या उत्पन्नानुसार क्रमवारी बनवण्यात आली आहे, यामध्ये कर्नाटकचे काँग्रेस आमदार असणारे एन. नागराजु हे 157.04 कोटींच्या उत्पन्नासह पहिल्या क्रमांकावर आहेत.

महाराष्ट्रातील भाजप आमदार मंगलप्रभात लोढा   हे उद्योगपती असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी आहे. तर सहाव्या क्रमांकावर असणारे आ दिलीप सोपल यांचा वकिली आणि शेतीचा व्यवसाय असून त्यांचे उत्पन्न 9.85 कोटी रुपये आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे 5.61 कोटी उत्पन्नासह सतराव्या स्थानावर आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे 20 व्या स्थानावर असून त्यांचे उत्पन्न 4.56 कोटी आहे.

हल्लाबोलने झटकणार का बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची मरगळ ?

हा आहे देशातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष

You might also like
Comments
Loading...