वस्ताद एक डाव राखून ठेवत असतो, सोपलांचा निरंजन भूमकर यांना सूचक इशारा

टीम महाराष्ट्र देशा; तुम्ही माझ्याच तालमीत तयार झालेले आहात, कालपर्यंत मला शिवसेनेत जाण्यासाठी तुम्ही पाठिबा दिला होता. मात्र, आता वैराग भागाची खोटी अस्मिता दाखवली जात आहे. पण वस्ताद आपला एक डाव राखून ठेवतो. हे विसरू नका, असं म्हणत शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांना सूचक इशारा दिला आहे. वैरागमध्ये आयोजित जाहीर सभेत सोपल बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा निमित्त वैरागमध्ये महायुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, भाजप नेते आणि महाहाउसिंगचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यासह भाजप, शिवसेना व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलता दिलीप सोपल यांनी अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राजेंद्र मिरगणे यांच्या पत्नी विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा समाचार घेतला आहे. पुरुषाने दुसऱ्या पुरुषा विरोधात दंड थोपाटायचे असतात, जन्मदात्या आईवर अथवा कोणत्याही महिलेवर बोलायचं नसत. दारू पिलेली माणस देखील सावधपणे बोलतात , मात्र, ज्यांचा बुध्यांक कमी आहे, ज्यांना कोणतीच पातळी नाही. त्यांच्याकडून जनतेने काय अपेक्षा करावी. २००४ साली तुम्हाला विधानसभा दाखवण्यात मिरगणे यांचा सिंहाचा वाटा आहे, अशी टीका सोपल यांनी केली आहे.

दरम्यान, वैराग तालुका निर्मितीचा विषय महायुतीच्या सरकारमध्येचं मार्गी लावला जाणार आहे. २००९ पासून या भागातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केला आहे. येत्या काळामध्ये मराठवाड्याला जाणारे उजनीच्या पाण्याने वैराग भागातील प्रकल्प भरणार असल्याचं सोपल यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या