बार्शीच्या राजकारणात ‘भाऊ’ व ‘साहेब’ एकत्र, जुन्या नव्या शिवसैनिकांचे मनोमिलन

blank

टीम महाराष्ट्र देशा: निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाने जुन्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा प्रचार केला जात होता. मात्र, एखाद्या चित्रपटाला शोभाव्या अशा पध्दतीने सोपल हे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या समवेत स्टेजवर आल्याने दोन्ही नेते ‘मिलेसुर मेरा तुम्हारा’चा नारा देताना पहायला मिळाले आहेत.

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे गेली आठ वर्षांपासून शिवसेनेची धुरा सांभाळणारे भाऊसाहेब आंधळकर नाराज असल्याचं बोलले जात होते. स्वतः आंधळकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. परंतु जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीने दोन्ही नेते एकत्र आले आहेत. जुन्या-नव्या शिवसैनिकांमध्ये मनोमिलन झाल्याने दिलीप सोपल यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

blank

भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपमध्ये असणारे राजेंद्र राऊत त्यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी आंधळकर यांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोलले गेले. मात्र राजकारणातील डावपेचात मातब्बर असणारे दिलीप सोपल यांनी आंधळकर यांची नुसतीच भेट घेतली नाही, तर त्यांच्या आईचे आशीर्वाद परिवाराची खुशाली जाणून घेतली होती. दुसऱ्याबाजूने तानाजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, विरोधकांकडून तालुक्यात केले जाणारे दहशतीचे राजकारण संपवण्यासाठी सोपल यांना समर्थन देता आहे. यापुढे सर्व शिवसैनिकांचा उचित सन्मान ठेवण्याचा शब्द त्यांनी दिला आहे, असं भाऊसाहेब आंधळकर सांगितले आहे. तर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहे, यापुढे शिवसेनेच्या विचारानुसार शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचे प्रश्न एकत्र सोडवणार असल्याचं दिलीप सोपल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या