fbpx

चाकण हिंसाचार : राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा जामीन अर्ज नाकारला

टीम महाराष्ट्र देशा : खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. मराठा क्रांती मोर्चास चाकण येथे हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दिलीप मोहिते यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी हा जामीन अर्ज फेटाळला आहे .

खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी मोहिते यांचा अर्ज फेटाळला आहे. चाकणच्या हिंसाचाराच्या घटनेआधी काही दिवस हे कटकारस्थान करण्यासाठी, एक गुप्त बैठक झाली. तिथे मोहिते होते. तसे काही साक्षीदारांचे जबाब आहेत, पण त्यांची नावे आता उघड करता येणार नाहीत. त्या जबाबांवरून आणि मोहिते यांच्या भाषणातील वक्तव्यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होत आहे, म्हणून त्यांना जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकील अरूण ढमाले यांनी केला. त्यामुळे त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे.

दरम्यान, मोहिते यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर यांनी पोलिसांनी कटकारस्थानाचे कलम वाढवून मोहितेंना आरोपी केले. त्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा छळ करण्याचा उद्देश आहे. म्हणून त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा अशी मागणी केली.