विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे उमेदवार

सोलापूर- माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. माने हे सोलापूरचे माजी आमदार आहेत असून उद्या ते उमेदवारी दाखल करणार आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भाजपकडून अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आज संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ययाच्या बैठकीत उमेदवार निश्चित केला जाणार आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणुक होणार आहे.