सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने

सोलापूर : येथील राज्यात दुसऱ्या क्रमाकांची समजली जाणाऱ्या श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माजी आमदार दिलीप माने यांची तर उपसभापती श्रीशैल नरोळे यांची अविरोध निवड करण्यात आली़. सोमवारी सकाळी ११ वाजता निवडणुक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली़. प्रारंभी अध्यासी अधिकारी यांनी उपस्थित संचालकांचे स्वागत केले़. सभापती व उपसभापती पदासाठी एक एक अर्ज आल्याने ही निवडणुक अविरोध घोषित करण्यात आल्याचे सांगण्यात आले़.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचेच नेते आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना जोर का धक्का दिला. बाजार समिती निवडणुकीत यंदा प्रथमच सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला होता, त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. भाजप नेते आणि पालकमंत्री असणारे विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे पक्षातील कुरघोडीचे राजकारण लपून राहिलेले नाही. याचं चित्र बाजारसमिती निवडणुकीत देखील पहायला मिळाले आहे.

सुभाष देशमुख यांना धोबीपछाड देण्यासाठी विजयकुमार देशमुख यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासोबत आघाडी केली होती. देशमुख-माने गटाला शिवसेना, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मदत केली. त्यामुळेच सहकारमंत्र्यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला.

सोलापूर विद्यापीठ नामांतरण: पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत कुठे ?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख

बाजार समितीत सांकेतिक भाषा वापरून कांदा उत्पादकांची लूटLoading…
Loading...