दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा,रुग्णालयातून आज मिळणार डिस्चार्ज

दिलीप

मुंबई : बॉलीवुडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने आज रविवारी सकाळी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसापासुन त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ९८ वर्षीय दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हिंदुजा रुग्णालयातील नॉन कोविड वार्डात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील महिन्यातही प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज नियमीत तपासणी आणि श्वास घ्यायला होत असलेल्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे.

काही दिवसापूर्वी सायरा बानो यांनी दिलीप कुमार तब्येतची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील फोटो देखील शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील कमेंट करत ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती.

महत्वाच्या बातम्या 

IMP