fbpx

शनिवारवाड्यावर आता सभा घेऊनचं दाखवा : कांबळे 

अहमदनगर :या वेळी कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, स्तंभापासून जवळ असलेल्या मैदानात सभेला परवानगीचा विचार करता येईल तसेच शनिवारवाड्यावर त्यांनी आता सभा करूनच दाखवावी. त्यांची गाठ सरकारशी असेल असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला आहे.  मंगळवारी अहमदनगर येथे भाजपच्या मनपा निवडणुकीतील जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकारांशी बोलताना हा दिला.
कांबळे यांनी भीमा कोरेगावमध्ये मागीलवर्षी १ जानेवारीला घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने भाष्य केले. गेल्यावर्षी १ जानेवारीच्या आदल्या दिवशी पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणे केली होती. षडयंत्र रचले गेले. भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ काही करण्याचा त्यांचा इरादा अलर्ट असलेल्या प्रशासनाने हाणून पाडला. त्यामुळे आता पुन्हा डिसेंबर जवळ आल्यावर त्यांच्याकडून काही विधाने सुरू आहेत. पण या वेळी कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, स्तंभापासून जवळ असलेल्या मैदानात सभेला परवानगीचा विचार करता येईल तसेच शनिवारवाड्यावर त्यांनी आता सभा करूनच दाखवावी. त्यांची गाठ सरकारशी असेल, असेही कांबळेंनी आवर्जून स्पष्ट केले.