fbpx

सुजय विखेंच्या अडचणी वाढणार, दिलीप गांधींचे पुत्र सुवेंद्र यांची बंडखोरी

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली. भाजपने तिकीट कापल्याने नाराज झालेले भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज नगरमध्ये मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

खा. गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करत बंडखोरी केली आहे. गांधींच्या या भूमिकेमुळे नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे आणि नंतर त्यांना उमेदवारी दिल्याने नाराज होते. अखेर आज त्यांच्या मुलाने म्हणजे सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्यामुळे सुजय विखे यांच्यासमोर आणखी एक मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

2 Comments

Click here to post a comment