दिल दिवाना..गाणं लोकप्रिय करणारे राम-लक्ष्मण ; जयंतीनिमित्त्य वाचा त्यांचा संगीतप्रवास

दिल दिवाना..गाणं लोकप्रिय करणारे राम-लक्ष्मण ; जयंतीनिमित्त्य वाचा त्यांचा संगीतप्रवास

ram lakshma

मुंबई : बॉलीवूडमधील एखादा कलाकार यशस्वी झाला की, वर्षानुवर्ष प्रसिध्दीत चमकत राहतो.  टैलेंट असलेल्या काहीं व्यक्ती धुसर होऊन जातात, मात्र  गाण्यांच्या माध्यमाने कायम स्मरणात असतात असंच एक संगीत क्षेत्रातील नाव म्हणजे विजय पाटील उर्फ संगीतकार रामलक्ष्मण.

त्यांचा जन्म १६सप्टेंबर १९४२ चा असून त्यांना काकांकडून संगीताचा वारसा लाभला. संगीताची सुरूवात मोठे बंधू सुरेंद्र यांच्या सोबत केले. या दोघांनी१९७७ मध्ये ‘एजंट विनोद’ चे संगीत कंम्पोज केले. त्यावेळी कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन असे नामी संगीतकारांची नावं चर्चेत असायची. यांची प्रेरणा घेऊन सुरेंद्र आणि विजय पाटील यांनी ‘राम-लक्ष्मण’ असं नाव ठेवल्याचं बोललं जातं.

मात्र या चित्रपटापूर्वीच सुरेंद्र यांचे मृत्यू झाले होते. तरीदेखील म्युझिक कंपनीचं नाव ‘राम-लक्ष्मण’ असंच राहू दिलं. त्यानंतर अनेक चित्रपटांना संगीत दिल असून विशेषत: मराठी चित्रपटात निर्माता,अभिनेता दादा कोंडके यांनी त्यांच्या ‘पांडू हवालदार’ ला संगीत देण्याची संधी दिली. यानंतर हमसे बढकर कौन, देवा हो देवा गणपती देवा..हे गाणं त्यांच्या संगीत साज ने सजला आणि आज ही सर्वांच्या आवडीचा ठरतो आहे. दरम्यान त्यांना ताराचंद बडजात्या निर्मित सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या संगीताची ऑफर मिळाली. या संधीच त्यांनी सोनं केलं असून या चित्रपटातील आजा शाम होने आई.., कबूतर जा जा जा आणि सर्वात लोकप्रिय ठरलेलं ‘दिल दिवाना, बिन सजना के माने ना.. हे आज ही आवडीच्या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर पत्थर के फुल मधील गाणं ‘कभी तू छलिया लगता है कभी जोकर लगता है.. यासह हिंदी, मराठी अनेक गाण्यांची पर्वणी संगीत चाहत्यांना दिली. नुकताच त्यांचा २०११ मध्ये ७८वर्षी निधन झाले. मात्र त्यांनी दिलेल्या संगीताची अजरामर गाणी आजही लोकप्रिय आहेत.

महत्त्वाच्या बातम्या