मंदिरात भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जातायत, दिग्विजयसिंह पुन्हा बरळले

Digvijay

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह पुन्हा एकदा बरळले आहेत. भोपाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आज, भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जात आहेत, मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत, हा आपला धर्म आहे?, असा सवाल त्यांनी केला आहे.

दिग्विजयसिंह हे आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता तर त्यांनी हिंदू धर्माबाबत वादग्रस्त उदाहरण देत सध्याच्या समाजाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दिग्विजय सिंह हे भाषणात सरकार टीका करताना हिंदू धर्मावर घसरले. भगवे वस्त्र नेसून लोक चूर्ण विकताहेत, देवळांमध्ये बलात्कार होत असल्याचे वक्तव्य केले.

दरम्यान ज्यांनी या सनातन धर्माची बदनामी केली आहे, त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या आधीच्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दिग्विजयसिंह हे आपल्या बेलगाम वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या कचाट्यात सापडतात. याआधीही ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. तर कॉंग्रेस पक्षालाही अडचणीत आणत आहेत.