नवी दिल्ली : नास्कॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशीप फोरम यांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. ‘तंत्रज्ञानामुळे सामान्य माणूस आणि सरकार यातील दरी कमी झाली आहे. तसेच वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे काळा पैसा घटला आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
तंत्रज्ञानामुळे सरकारी कामकाजात पारदर्शकता आली आहे. पायाभूत सुविधेशी निगडीत अनेक प्रकल्पांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चिन्हीत केले जात आहेत. तसेच यावर ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवली जात आहे. जेणेकरून प्रकल्प वेळेत पूर्ण केले जाऊ शकतील. तंत्रज्ञानामुळे मनुष्य दखल कमी केली जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना आयटी सेक्टरचे अनेकविध उपयोग सांगत कौतुक केले. सरकारने तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला अनेक सोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेकडो सरकारी सुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोरोना संकटात विज्ञान आणि तंत्रज्ञानाता आपले सिद्धत्व पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. काही काळापूर्वीपर्यंत आपण लसींसाठी इतरांवर अवलंबून असायचो. मात्र, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारताने स्वतःची कोरोना लस तयार केली आणि अनेक देशांना आपण ती पाठवत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मराठा आरक्षणाच्या केसमध्ये मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही स्वतः लक्ष घालावं; हलगर्जीपणा करु नये’
- भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले
- आम्हीच श्रीरामांचे वंशज, भाजपला श्रीरामचंद्रांशी काही घेणं देणं नाही – राकेश टिकैत
- भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’