न्युझीलंडसमोर अडचण! दुखापतीमुळे कर्णधार विल्यमसन दुसऱ्या कसोटीतुन बाहेर

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान इंग्लंडमध्ये भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याआधी न्युझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला आहे. तर दुसरा सामना आजपासुन म्हणजे १० जुनपासुन एजबॅस्टन येथे होणार आहे.

मात्र दुसरा सामना सुरु होण्यापुर्वी न्युझीलंडच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. न्युझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातुन बाहेर पडला आहे. विल्यमसनला कोपराच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळु शकणार नाहीये. न्युझीलंचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मार्च महिन्यात केनला झालेल्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी केनला या सामन्यात न खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.’

केन विल्यमसनच्या अनुपस्थिती सलामीवीर टॉम लॅथम हा संघाचे नेतृत्व करणार आहे. तर केनच्या जागी बदली खेळाडु म्हणुन विल यंग हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. तर या सामन्यातून न्युझीलंड संघाचा महत्वाचा गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट हा पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या सामन्यात न्युझीलंडने वर्चस्व गाजवले होते. मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला सामना अनिर्णीत राखण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP