कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडचणी वाढल्या

flag of congress

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहे. ईडीने पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्याविरोधात आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्याविरोधात केंद्रीय एजन्सीने दिल्ली येथील विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्या विशेष न्यायालयात पासवर्डचे संरक्षण असलेले ई-आरोपपत्र दाखल केलं आहे.

आरोपपत्रात चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त सनदी लेखापाल एस.एस. भास्कर रमण आणि कार्ती यांच्यासह अन्य नावेही आहेत. चिदंबरम यांनी स्वत: च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. मात्र, गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी ईडीने दाखल केलेल्या खटल्यात कॉंग्रेस नेते चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला.

नेमकं काय आहे प्रकरण ?

सन २००७ मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची (एफआयपीबी) मंजूरी देताना नियमांचं पालन केलं नसल्याचा आरोप आहे. सीबीआयने १५ मे २०१७ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पी. चिदंबरम यांच्या खासदार निधीतून मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयाला १ कोटी रूपये

पी. चिदंबरम यांना राजकीय सूडबुद्धीने अटक, पुत्र कार्ती चिदंबरम यांचा थयथयाट