फारूक अब्दुल्लांनी पाकिस्तानला समजवावे- शिवाली देशपांडे

Defence expert criticized Farooq Abdullah

नागपूर – भारत आणि पाकिस्तान यांची तुलनाच होऊ शकत नाही. भारत हे लोकशाही मूल्य जपणारे जबाबदार राष्ट्र असून पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. त्यामुळे शांतता हवी असेल तर युध्द बंदीचे उल्लंघन करू नये असे अब्दुल्लांनी पाकिस्तानला समजवावे अशा परखड शब्दात संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांनी अब्दुल्लांच्या विधानांचा समाचार घेतला आहे.

Loading...

यासंदर्भात हिंदुस्थान समाचारशी बोलताना सेवानिवृत्त फ्लाईंग ऑफिसर शिवाली देशपांडे म्हणाल्या की, भारत कधीच कुठल्याही शेजारी देशाच्या कुरापती काढीत नाही. आजपर्यंत पाकिस्तानशी झालेला संघर्ष आणि युध्द याला तेच जबाबदार आहेत. पाकिस्तानात दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रं चालतात. ते भारताच्या विरोधात जिहादी दहशतवादी तयार करवून आमच्या देशात घुसखोरी करवतात. तसेच घुसखोरीसाठी सीमेवर गोळीबार करतात. भारत स्वतःहून कधीच कुणावर हल्ला करीत नाही. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यांना प्रत्युत्तर देणे हा भारताचा अधिकार आहे. जम्मू-काश्मिरातील फुटीरवादी आणि अब्दुल्लांसारखे नेते अशा विधानातून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहेत. पाकिस्तानच्या पैशावर काश्मिरात भारतीय सैनिकांवर दगडफेक केली जाते त्याला हीच माणसे जबाबदार आहेत. अशा प्रकारची बेताल विधाने करून अब्दुल्ला पाकिस्तानचा छुपा अजेंडा चालवत आहेत. त्यामुळे त्यांना शांती अभिप्रेत असेल तर अब्दुल्लांनी पाकिस्तानला युध्दबंदीचे उल्लंघन करू नका असे आवाहन करावे असे देशपांडे यांनी सांगितले.

काय म्हणाले अब्दुल्ला ..? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्ताकडून झालेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान आणि चार सैनिकांना विरमरण आले. या पार्श्वभूमीवर बोलताना फारूक अब्दुल्लांनी म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन्ही देश सीमेवर गोळीबार करत आहेत. त्यांच्या मिसाईलला जर आपण मिलाईलने प्रत्युत्तर दिले तर त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही.

युद्धाच्या मार्गाने काश्मीरमधली परिस्थिती कधीच सुधारणार नाही. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करायला पाहिजे. बंदुकीच्या छायेत चर्चा अशक्य – देशपांडे फारूक अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मिरातील इतर फुटीरवादी नेते असली भाषा वापरून पाकिस्तानच्या छुप्या अजेंड्याला बळ देतात. भारत कधीच स्वतःहून युध्दबंदीचे उल्लंघन करीत नाही. त्यांच्याकडून होणा-या कुरापती व हल्ल्यांना आम्ही प्रत्युत्तर देतो. सीमेवर गोळीबार आणि वातानुकूलीत खोल्यांमध्ये बसून चर्चा या दोन्ही गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत. त्यामुळे अब्दुल्लांना शांती हवी असेल तर त्यांनी पाकिस्तानला समजवावे असे शिवाली देशपांडे यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...