‘मेले की त्यांना मारले?’ कर्नाटक घटनेवरून राहुल गांधी संतापले

rahul gandhi

नवी दिल्ली : ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये २३ कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. पण ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात न आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला

या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘मेले की मारले? त्यांच्या कुटूंबीयांबद्दल मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. व्यवस्थेला जाग येण्याआधी अजून असा किती त्रास सहन करावा लागणार आहे?’ असा प्रश्न राहुल यांनी ट्विटद्वारे विचारला आहे.

दरम्यान, कर्नाटक घटनेवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या डी.के. शिवकुमार यांनी या अपघाताला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांना शिवकुमार यांना सवाल केला आहे. राज्यात पुरेसा ऑक्सिजन आहे. पण उत्तर देण्यास कुणीही जबाबदार नाही. राज्य सरकार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सक्षम नाही. त्यामुळे आणखी किती जणांचा जीव जाईल? असे शिवकुमार म्हणालेत.

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच मंगळवारी आपत्कालीन कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री एस. सुरेश यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या