तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करावा असं नाही वाटलं का?

Uma Khapre

मुंबई : ऑक्सिजन अभावी राज्यात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारच्या विरोधात खटला दाखल करायला हवा, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील रुग्णांनी ऑक्सिजन अभावी जीव गमावला तेव्हा संजय राऊत कुठे गेले होते? असा प्रश्न खापरे यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात उमा खापरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला… महाराष्ट्रातील जेव्हा अनेकांनी ऑक्सिजन अभावी आपला जीव गमावला, तेव्हा कुठे गेलेले संजय राऊत? तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करावा असं नाही वाटलं का? सोडा आता सारखं सारखं केंद्रावर ताशेरे उडवण…’

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन मिळाले नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी संसदेतही उत्तर दिले आहे. मात्र, विरोधकांचे या उत्तराने समाधान झाले नसून विरोधक अधिक आक्रमक झाले असल्याचे दिसून येते. यावरुन आता राज्यातही शिवसेना – भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP