‘दीदी, तुम्ही चूक मान्य करा’; शर्लिन चोप्राने पुन्हा साधला शिल्पावर निशाणा

‘दीदी, तुम्ही चूक मान्य करा’; शर्लिन चोप्राने पुन्हा साधला शिल्पावर निशाणा

shilpa shety

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पालाही प्रश्न विचारले जात आहेत. पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. यामुळे तिला आणि कुटुंबाला अधिक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र या प्रकरणी चर्चेत असलेली अभिनेत्री शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीवर निशाणा साधला आहे.

सोशल मिडियावर शर्लिन चोप्राने एक व्हिडीओ शेअर करत शिल्पाने शिल्पाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. शर्लिनने हा व्हिडीओ शेअर करताना असं कॅप्शन दिलं आहे की, ‘हाय शिल्पा दीदी, मी तुम्हाला विनंती करते की पीडित मुलींबद्दल थोडी सहानुभूती दाखवा आणि तुमच्या चुका स्वीकारा. चूक मान्य केल्यास कोणीही लहान होत नाही.’ तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.

राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात का मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असून याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच प्रकरणाशी संबंधित अभिनेत्री शर्लिन चोप्रा देखील चर्चेत होती. शर्लिनने राजवर या प्रकरणानंतर गंभीर आरोप देखील केले होते.

महत्त्वाच्या बातम्या