खिलाडी कुमारचा स्टंट तुम्ही पाहिलात का?

टीम महाराष्ट्र देशा : खिलाडी अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल-४’ या चित्रपटाचे शूटिंग लंडन मध्ये सुरू केले आहे. शूटिंगचे काही फोटोज फराह खानने ट्विटरवर शेअर केले आहेत. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात अक्षय कुमार खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अभिनेत्री पूजा हेगडे शेअर केला असून चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित हा व्हिडिओ असल्याचे म्ह्टले जात आहे.

पूजा हेगडेने ट्विटरवर एक व्हिडिओ ‘हाऊसफुल-४’च्या सेटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अक्षय कुमार जमिनीपासून अनेक फूट उंचीवर एक खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओ पोस्ट करत पूजाने लिहिलयं की, ‘Just a normal day in London..or is it??!’

या आधी अक्षय कुमार ने हाऊसफुलच्या सिक्वेल मध्ये भूमिका केली आहे. प्रेक्षकांमध्ये  ‘हाऊसफुल-४’ ची उत्सुकता आहे. ‘हाऊसफुल-४’ ला साजिद खान दिग्‍दर्शित करतो आहे, तर निर्मिती साजिद नाडियाडवाला यांची आहे.

अक्षयने दिला स्वच्छतेचा संदेश

नेहमीच सामाजिक विषयांवर सिनेमा करण्याची इच्छा होती, पण?- अक्षय कुमार

You might also like
Comments
Loading...