मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमधली ऍक्शन, ड्रामा, कलाकारांचा अभिनय, त्यांची स्टाईल सर्वच अगदी दिलखेचक असते. त्यामुळेच या सिनेमांची लोकांमधील क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. २०१८ साली असच एक साऊथ सिनेमा प्रदर्शित झाला होता ‘केजीएफ’ या सिनेमाने लोकप्रियतेचे, प्रसिद्धीचे आणि कमाईचे शिखर गाठले होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग केजीएफ चॅप्टर २ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच फॅन्समध्ये सिनेमाबाबत खूपच उत्साह दिसून येत आहे.
हा सिनेमा १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रतिक्षा लोकं मागील काही महिन्यांपासून करत आहे. सिनेमाचे प्रमोशन देखील चालू झाले आहे. नुकतेच या सिनेमातील पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. गाण्याचे नाव आहे ‘तुफान’. या गाण्यातून प्रेक्षकांना रॉकी भाईची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. गाण्याचे बिट्स अतिशय एनर्जेटिक असून, रिदम देखील दमदार आहे. हे गाणे चित्रपटातील यशच्या भूमिकेला पूर्ण न्याय देताना दिसत आहे. चित्रपटात यश गरिबांचा देवदूत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :