मुंबई : ‘KGF’ या चित्रपटाच्या माध्यमाने सर्व परिचित झालेला दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) देशभरात गाजला. त्याच्या चित्रपटाने त्यास नाव, पैसा तसेच प्रसिध्दी ही मिळवून दिली आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक कन्नड चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ‘KGF Chapter 1’ ने त्यांना यशाच्या उच्च शिखरावर नेले. करोडोंची कमाई, नाव आणि प्रसिद्धी कमावणाऱ्या यशचे वडील काय करतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊ या.
दरम्यान यशने २००८ मध्ये ”मोग्गीना मनसु” या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो ‘राजधानी’, ‘ड्रामा’, ‘गुगली’, ‘राजा हुली’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’, ‘मास्टरपीस’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 1’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका वठविली. यशचा पुढचा चित्रपट ‘KGF: Chapter 2’ या वर्षी रिलीज होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
अभिनेता यशची आई पुष्पा (pushpa) गृहिणी आहे. त्याला एक बहीण देखील आहे, तिचे नाव नंदिनी आहे. यशने त्यांचे बालपण म्हैसूरमध्ये व्यतीत केले आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय शिकण्यासाठी बिनाका नाटक मंडळात सामील झाले. यानंतर यशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले, परंतु २००८ मध्ये त्याला पहिला चित्रपट आला, ज्यामध्ये त्याची सहकलाकार राधिका पंडित होती, जी आज त्याची पत्नी आणि दोन मुलांची आई आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि यश एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. दोघे अनेक चित्रपटांमध्ये दिसले आणि २०१६ मध्ये गुपचूप लग्न केले आणि त्याच वर्षी बंगळुरूमध्ये त्यांचे खाजगी लग्न झाले. यानंतर रिसेप्शन पार्टी झाली तेव्हा यशने सर्वांना खुलेआम आमंत्रित केले.
मात्र करोडोंची कमाई करणारे यशचे वडील अरुण कुमार (father Arun Kumar) हे आज ही असं काम करतात, ज्याचा त्यांना खूप अभिमान वाटतो. अभिनेत्याचे वडील अरुण कुमार हे चक्क बीएमटीसी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. यशच्या वडिलांना त्याचं काम आवडतं असं म्हटलं जातं. म्हणूनच तो सुपरस्टारचा बाप असूनही पूर्ण समर्पणाने आपले काम करतो. बस ड्रायव्हरचा मुलगा ‘रॉकिंग स्टार’ अशी जरी यशची ओळख असली तरी यामुळे चाहत्यांसह सर्वांना याबद्दल अभिमान वाटावा असाच आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी
- ”KGF” या एकाच चित्रपटाने सुपरस्टार बनलेला यश आज साजरा करतोय त्याचा ३५ वा वाढदिवस
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
- नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<