झिंटा टीम जिंकली का? सलमान खानचे ट्विट व्हायरल

preeti jinta

मुबई : यंदाची आय.पी.एल पंजाब संघासाठी चांगली ठरली नसून, या आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. यंदाच्या मोसमात ख्रिस गेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आहे. मात्र ७ सामने होऊन देखील ख्रिस गेलला खेळवण्यात आलेले न्हवते.

पंजाबने आतापर्यंत ७ पैकी ६ सामने गमावले असून चाहते ख्रिस गेलच्या आगमनाची वाट पाहत होते. अखेर ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघासोबत सामना खेळताना दिसला आणि पंजाबला विजय देखील मिळवून दिला.

पंजाबच्या या विजयानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचं २०१४ चे ट्विट व्हायरल झाले. त्यात त्यानं, झिंटा टीम जिंकली का?. असा प्रश्न विचारला होता. सलमान खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमानच्या या ट्विटचे बरेच मेम्स देखील बनवले जात आहे. सलग पंजाबने सहा सामने गमावून अखेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाचा पराभव केला आणि विजय मिळवला या विजयांनंतर सलमानचे हे ट्विट व्हायरल झाले.

महत्वाच्या बातम्या-