‘सर्वज्ञानी संजयजी डोंबिवलीतील घटना कळली का; आता सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आहे का’

chitra wagh vs sanjay raut

मुंबई : डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असतानाच हि घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान यावर आता भाजपने सरकारला धारेवर धरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या नेत्या व प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट करत शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘सर्वज्ञानी संजय राऊतजी डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडलीये कळलयं का आपल्याला आता कुणाचं थोबाडं फोडायचं संजयजी? आहे का सरकारचं थोबाड फोडायची हिम्मत आपल्यात ?’ असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना धारेवर धरले आहे.

तर दुसरीकडे भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व प्रकरणामुळे ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘मुख्यमंत्री महोदय तुमची सत्ता हजार वर्षे ठेवा पण महिला सुरक्षित ठेवा. अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. पण यावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या