सीतारामन तुम्हाला ‘निर्बला’ म्हणावं का ? संसदेत कांग्रेस नेत्याची जीभ घसरली

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते आधी रंजन चौधरींची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कार्पोरेट टॅक्सबाबत सरकारची भूमिका मांडली. त्यावर बोलताना आधी रंजन चौधरी यांनी सीतारामन यांचा ‘निर्बला’ असा उल्लेख केला. यावर भाजप खासदरांनी आक्षेप घेत सभागृहात चांगलाचं गदारोळ घातला.

लोकसभेत कार्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या चर्चेत सहभाग घेताना चौधरी यांनी निर्मला सीतारामन यांचा उल्लेख ‘निर्बला’ सीतारामन असा केला. झाले असे की, सीतारामन यांनी आज लोकसभेत कार्पोरेट टॅक्सबाबत सरकारची भूमिका मांडली. त्यावर काँग्रेसकडून काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यावर भाष्य केलं. मी तुमचा नेहमीच सन्मान करतो. तुमच्याबद्दल मला आदरही आहे. पण कधी कधी तुमची केविलवाणी अवस्था पाहता येत नाही. त्यामुळे तुम्हाला निर्मला सीतारामन ऐवजी निर्बला सीतारामन म्हणणं योग्य ठरेल का? कारण तुम्ही मंत्री आहात आणि तुम्हाला जे करायचं आहे. ते तुम्ही कधीच करत नाही. असं का होतं मला माहीत नाही, असा टोला चौधरी यांनी लगावला.

चैधारी यांच्या या विधानानंतर सभागृहातील भाजप खासदारांनी आक्षेप घेत चांगलाच गदारोळ घातला. तसेच चौधरी यांनी एनआरसीच्या मुद्द्यावर आपलं मत मीडियासमोर व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातमधून आले आहेत. ते दिल्लीचे निवासी नाहीत, ते स्वत: घुसखोर आहेत, अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी सीतारामन यांना टार्गेट करत पुन्हा मुक्ताफळे उधळली आहेत.

महत्वाच्या बातम्या

Loading...