संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न

संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? नीलेश राणे यांचा खोचक प्रश्न

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरुन केलेल्या वक्तव्यावर चांगल्याच प्रतिक्रीया उमटल्या आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रीया चर्चेत राहिली. त्यावर आता भाजप नेते नीलेश राणे यांनी टीका केलीय. मुळामध्ये संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केलाय.

या संबंधी नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोचक प्रश्न करत खासदार राऊत यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘संज्याने कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेला आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसर, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही.’

विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक पहाटे शपथ विधी उरकला होता. त्या नंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र, दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. ती आमची चूक होती, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या