दानवेंनी मदत केली की नाही, चंद्रकांत खैरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

Chandrakant-Khaire

टीम महाराष्ट्र देशा :औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्क्ष रावसाहेब दानवे यांनी मदत केली नाही. याचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.

Loading...

औरंगाबादमध्ये भाजप-सेना युतीकडून चंद्रकांत खैरे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे त्यांना मित्रपक्ष भाजपच्या मदतीची अपेक्षा होती. परंतु रावसाहेब दानवे यांनी आपल्याला मदत न करता अपक्ष उमेदवार आणि जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केली असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत खैरे महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांना उमेदवारीची अपेक्षा होती परंतु सेनेने विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा संधी दिल्याने जाधव नाराज झाले होते. त्याच बरोबर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आहे.Loading…


Loading…

Loading...