पृथ्वीराज चव्हाण पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहीत नाही – गिरीश बापट

पुणे – पृथ्वीराज बाबा पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आमदारकीची उमेदवारी मागून फायदा नाही असा टोला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि नगरसेवक आबा बागुल यांना लगावला. पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या विलासरावजी देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते.

नगरसेवक आबा बागुल जेव्हा मनोगत व्यक्त करत होते त्यावेळी त्यांनी आपण 30 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहोत. त्यामुळे पुढच्यावेळी आमदारकीची उमेदवारी मिळावी अशी जाहीर मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. याच मुद्द्यावरून बापट यांनी हा टोला लगावला .

नेमकं काय म्हणाले बापट

पृथ्वीराज बाबांकडे आमदारकीची मागणी काय करताय, बाबाच पुढच्यावेळेस आमदार होतील का नाही सांगता येत नाही . ते कदाचित खासदार होतील . आबा बागुल तुम्ही पुढील 30 वर्ष नगरसेवकच रहा.पुण्याला तुमची गरज आहे.तुमच्या संकल्पनेतील या तारांगणामुळे पुण्याच्या अभिमानात एक भर पडली आहे.