Video- माझ्या मुलाला मराठा होता म्हणून मारलं का ? राहुल फटांगडेच्या आईचा सवाल

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगडे यांची आई जनाबाई फटांगडे यांनी बोलतांना राहुलच्या मृत्यूला दोषी असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. माझ्या मुलाला मराठा होता म्हणून मारलं का? त्याला एवढं मारलं की मारूनच टाकलं. यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. असेही त्या म्हणाल्या.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरात सन्मान मोर्चाचं आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात सुरक्षेचं कारण पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

शिवप्रतिष्ठानतर्फे शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतही सकाळी १० वाजता ओंकारेश्वर मंदिराजवळील नदीपात्रात जमून, लालमहालापर्यंत चालत जाण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठाननं केला आहे.