इंदिराजींनी आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या होत्या काय ? नितीन गडकरींचे इंदिरा गांधींवर स्तुतिसुमने

टीम महाराष्ट्र देशा : माझा जात आणि आरक्षणाच्या राजकारणावर मुळीच विश्‍वास नाही. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरुष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. अशा या कर्तृत्ववान महिलेने आरक्षणाच्या कुबड्या घेतल्या होत्या काय ? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदिरा गांधी या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श असल्याचे गौरवोद‍्गार काढले. गडकरी यांच्या हस्ते नागपुरात महिला बचत गटाने आयोजित केलेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ते महिला सक्षमीकरण या विषयावर बोलत होते.

देशावर आणीबाणी लादल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने नेहमीच टीकेचे लक्ष्य केलेल्या इंदिरा गांधी यांची गडकरी यांनी स्तुती केल्याने, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव करत असताना गडकरी यांनी भाजपच्या महिला नेत्या सुषमा स्वराज, वसुंधराराजे शिंदे आणि सुमित्रा महाजन यांच्या नावांचाही आवर्जून उल्लेख केला.

You might also like
Comments
Loading...