चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) पंजाबमध्ये आले असता आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता. त्यामुळे मोदींना जवळपास पंधरा मिनीटे वाहनात अडकून पडावे लागले होते. यावर भाजप नेत्यांनी पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (CM Charanjit Singh Channi) यांनी उत्तर दिले आहे.
सीएम चन्नी भाजपचे आरोप फेटाळताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. काय त्यांना तीथे कोणी दगड मारला, कोणी गोळी झाडली, त्यांना काही खरचटलं, की ते जखमी झाले? मग देशात त्यांनी पंप्रधानांच्या जीवाला धोका आहे असा खोटा अपप्रचार आमच्याविरोधात का केला? असा सवालही चन्नी यांनी उपस्थित केला आहे.
तसेच चन्नी यांनी सरदार पटेल यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोखाली त्यांनी लिहीले की, ‘ज्यांना कर्तव्यापेक्षा जीवाची जास्त काळजी असते त्यांना देशाची मोठी जबाबदारी नाही घ्यायला पाहिजे’. अशी खोचक टीका मुख्यमंत्री चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबतचे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात गेले आहे. राज्यानेही याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. चौकशीनंतर काय ते समोर येईलच. सध्याच्या आरोप प्रत्यारोपाला पाहून हे प्रकरण अनेक दिवस गाजण्याचे चिन्हे दिसत आहेत. असेही चन्नी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<