घराणेशाही असलेले पक्ष हे भारताचे सर्वात मोठे संकट- पंतप्रधान मोदी

घराणेशाही असलेले पक्ष हे भारताचे सर्वात मोठे संकट- पंतप्रधान मोदी

narendra modi

नवी-दिल्ली : आज २६ नोव्हेंबरला भारतात संविधान दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान समितीने भारतीय राज्यघटनेचा अवलंब केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधानाची अंबलबजावणी करण्यात आली. जवळपास २ वर्ष ११ महिने आणि १७ दिवस आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जगातील सर्वात मोठ्या संविधानावर काम करण्यात आले होते. दरम्यान, आज या भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,’स्वातंत्र्यानंतर संविधान दिवस साजरा करायला हवा होता. जेणेकरून पुढील पिढ्यांना संविधान कसं निर्माण झालं हे कळलं असतं. मात्र, हा संविधान दिन खूप उशिरा साजरा झाला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव व्हावं हे ऐकण्यास देश तयार नाही. आजही बाबासाहेबांच्या कामाचं पुण्यस्मरण करण्याची इच्छा न होणं ही काळजीची बाब आहे. जे पक्ष लोकशाही तत्व हरवले ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील? जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भारत एका संकटातून जात असल्याचं दिसतं. ते संकट म्हणजे घराणेशाही असलेले पक्ष.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’काही राजकीय पक्ष हे काही कुटुंबांकडून काही कुटुंबांसाठी चालवले जातात. हे पक्ष लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहेत. घराणेशाही असलेले पक्ष म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक लोक पक्षात येऊ नये असं नाही, तर एखादा पक्ष अनेक वर्षे एका कुटुंबाकडून चालवला जाणे हे लोकशाहीसाठी संकट आहे. आपलं संविधान भ्रष्टाचाराला परवानगी देत नाही. न्यायालयाने एखाद्याला भ्रष्टाचाराची शिक्षा दिली असेल आणि त्यानंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचं गुणगान होत असेल तर देशातील तरुणांच्या मनात भ्रष्टाचाराच्या मार्गावर चालण्याला मान्यता मिळते.’

महत्वाच्या बातम्या: