श्रीपाद छिंदम 300 मतांनी पिछाडीवर !

नगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी तुरुंगवास भोगवा लागलेले नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हे मतमोजणीत पिछाडीवर आहेत.

महापालिकेतील एका कंत्राटदाराशी फोनवरुन बोलताना छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले होते. त्यानंतर त्यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरात मोठा गदारोळ माजला होता. याप्रकरणी छिंदम यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांनी न्यायालयीन कोठडीत रहावे लागले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा एकदा नगरच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. भाजपाकडून ते पुन्हा एकदा पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, जनतेचा रोष पत्करावा लागलेले छिंदम सध्याच्या मतमोजणीमध्ये 300 मतांनी पिछाडीवर आहे.