अनिल गोटेंचे बंड फसले, जनतेने नाकारल्याने लोकसंग्रामचे उमेदवार धुळ्यात पिछाडीवर

anil-gote

धुळे : आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्रामचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून धुळ्यात ३० जागांचा टप्पा ओलांडला आहे .

लोकसंग्राम पक्षाला मतदारांनी साफ नाकारलं असून अनिल गोटेंबद्दलची नाराजी मतदारांनी मतदानातून दाखवून दिली आहे. त्यामुळे गोटे याचं  बंड भाजपाच्या पथ्यावरच पडल्याचं मानलं जातंय. तसंच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मतदारांचा विश्वास, या निकालांमधून पुन्हा सिद्ध झाला आहे. मराठा आरक्षणही भाजपाला फळल्याचं जाणकारांचं मत आहे.

धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकांमध्ये त्रिशंकू निकाल लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे अंतिम आकडे कसे असतात आणि त्यानंतर काय समीकरणं पाहायला मिळतात, याबद्दल उत्सुकता आहे.