धुळे हत्याकांड: २५ लाख आणि सरकारी नोकरी देईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही

youth-crime-

धुळे : मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील राईपाडा गावात ज्या पाचजणांना बेदम मारहाण झाली होती त्यात त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. काल रात्री या पाचही लोकांचे शवविच्छेदन पार पडले. तेव्हा त्यांच्या कुटुबीयांनी जोपर्यंत आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होऊन, प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचं म्हंटलं आहे.

हे पाचही जण मंगळवेढ्यातील डवरी गोसावी समाजाचे आहेत आणि या समाजात आता भीतीचे तर काही ठिकाणी दहशतीचे वातावरण पसरले आहे. भारत भोसले व भारत मावळे त्याचबरोबर मानेवाडी येथील आप्पा इंगोले तर कर्नाटक सीमेवरील राजू भोसले यांचा या मारहाणीत हे मृत्यू झाला आहेत.

मंगलवेढा तालुक्यात बऱ्याच प्रमाणावर डवरी गोसावी समाजाची लोक वास्तव्यास आहेत. या समाजातील लोकांना स्वतःची अशी उदर निर्वाहासाठी शेत जमीन नाही.त्यामुळे ह्या समाजातील लोक देश भरफिरून आपल्या कुटुंबियांचं पालन पोषण करतात. याच तालुक्यातील गणेशवाडी, कचरेवाडी, जिंती, खवे, निंबोणी,या परिसरातील अनेक कुटुंबीय बाहेर आहेत.रविवारच्या घटनेमुळे डवरी समाजात भीतीचं वातावरण पसरले आहे.

एकाच घरात ११ मृतदेह सापडल्याने दिल्ली हादरली, आत्महत्या कि हत्या गूढ कायम

Loading...

1 Comment

Click here to post a comment