fbpx

धुळे – अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस, उद्या मतदान

maharashtra political party

मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अखेर थंडावला आहे. उद्या म्हणजे 9 डिसेंबर रोजी दोन्ही महापालिकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.

अहमदनगर महानगर पालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये 351 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीत 2 लाख 56 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 73 इमारतींमध्ये 337 मतदान केंद्र असून त्यातील 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील आणि 137 संवेदनशील मतदान केंद्र आहेत.

धुळे महापालिकेची ७४ जागांसाठी निवडणूक होत आहे. लोकसंग्राम वगळता एकाही राजकीय पक्षाला सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. भाजपचे ६२, राष्ट्रवादीचे ५३, काँग्रेस २१, शिवसेना ४९, रासप १७, एमआयएम १६, भारिप आठ, बसपकडून आठ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.