विश्वचषक विजयाच्या दिवशीच धोनीचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली: टीम इंडियाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. पद्मभूषण हा देशातला तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो.

टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डेचाही विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे आज २ एप्रिल २०१८ टीम इंडियाच्या दुसऱ्या विश्वचषक विजयाला आज सात वर्षे पूर्ण झाली.

कुलशेखराच्या चेंडूवर षटकार खेचून महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाच्या त्या विश्वचषक विजयावर शिक्कामोर्तब केला होता. वानखेडे स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता.