वन-डे क्रिकेटमध्ये धोनीने गाठला दहा हजारांचा टप्पा

 टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाचा यष्टिरक्षक खेळाडू महेंद्रसिंह धोनीने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी चौथा भारतीय खेळाडू ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणारा धोनी बारावा फलंदाज ठरलाय. धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Loading...

याचसोबत जागतिक क्रिकेटमध्ये 10 हजार धावांच्या जादूई आकड्याला गवसणी घालणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही करामत करुन दाखवलेली. संगकाराचा 14 हजार 234 धावांचा विक्रम मोडणे सध्यातरी धोनीसाठी कठीण दिसत असले तरी या कामगिरीमुळे धोनी 10 हजारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. याशिवाय यष्टिरक्षक म्हणूनही धोनीने 400 विकेट्सचा टप्पा पार केला.

आणि रोहित शर्माने घेतली मलिंगाची गळाभेट. . .

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...