जम्मू काश्मीरमध्ये धोनी घेणार पॅराशूट रेजिमेंट सोबत ट्रेनिंग

टीम महाराष्ट्र देशा :  टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. या काळात तो भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंट सोबत प्रशिक्षण घेणार आहे. हे प्रशिक्षण जम्मू काश्मीर मध्ये होणार आहे. परंतु त्याला थेट ऑपरेशन मध्ये सहभाग घेता येणार नाही.

दरम्यान, महेंद्र सिंग धोनीला २०११ साली सैन्याचा मोलाचा सन्मान म्हणजेच लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवण्यात आले होते, तसेच तो सैन्याच्या १०६ इन्फंट्री बटालियनचा भाग होता. याशिवाय अनेक प्रसंगी धोनीने आपले सैन्याशी जोडलेले नाते सर्वांसमोर दाखवले होते, तसेच मागच्या वर्षी आपल्याला मिळालेला पद्मा भूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुद्धा त्याने आर्मीचा गणवेश परिधान केला होता.