धोनीच आणखी एका क्षेत्रात पदार्पण अॅनिमेटेड सीरिजमध्ये बनणार ‘गुप्तहेर’

धोनी

मुंबई : १५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंडियन टीमचा कूल कॅप्टन आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड धोनी करतो. मध्यंतरी धोनीचे शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या होत्या.

त्यानंतर आता धोनी आणखी क्षेत्रात पदार्पण करणार आहे. धोनी आता एका सीरिजची निर्मिती करणार आहे. ही ॲनिमेटेड सिरीज धोनीच्या आयुष्यावर आधारित असणार असून ‘कॅप्टन-7’ असे या सिरीजचे नाव असणारकारण धोनी क्रिकेटमध्ये सात नंबर असलेल्या जर्सी घालायचा आहे. आयपीएलचा 14 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने याची घोषणा केली.

ही सीरिज हेरगिरी वर आधारित असून हेरगिरी वरील ही देशातील पहिली ॲनिमेटेड सिरीज आहे. या सीरिजच्या पहिल्या भागावर काम सुरू असून महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनीचे प्रोडक्शन हाऊस ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड अँड ब्लॅक व्हाईट ऑरेंज ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड’ यानंतर बॅनर खाली ही सीरिज बनणार आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या