धोनीच्या संघाला वाटते या खेळाडूची भिती !

#IPL २०१९ : आयपीएलच्या बाराव्या मोसमातील पाचवा सामना आज दिल्लीच्या कोटला मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपरकिंग मध्ये होणार आहे. या मोसमात दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही संघाने आपापल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवला आहे.  त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये दुसरा विजय मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

आजच्या सामन्यात चाहत्यांचे खरे लक्ष क्युट बॉय ‘रिषभ पंत’ च्या फलंदाजीकडे असणार आहे. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना रिषभ पंत ने आक्रमक फलंदाजी करत केवळ २७ चेंडू मध्ये ७८ धावा केल्या होत्या. पंतच्या या आक्रमक फलंदाजी समोर मुंबई इंडियन्सचे धाकड गोलंदाज देखील हताश होताना दिसले. पंत ने आतापर्यंत ३९  सामने खेळत १३२६  धावा कुटल्या आहेत.

तर दुसरीकडे दिल्लीच्या संघात वेगवान गोलंदाज देखील चांगलेच चमकत आहेत.कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजामुळे दिल्लीच्या गोलंदाजीला चांगलीच धार आली आहे. रबाडा ने आता पर्यंत आयपीएल मध्ये ७ सामने खेळले असून ८ विकेट स्वतःच्या नावावर केल्या आहेत.

तसेच चेन्नई हा संघ आयपीएलच्या मोसमातील लक्षवेधी संघ आहे. या संघात अनुभवी खेळाडू आहेत. या संघाचा शिलेदार एम. एस. धोनी यावर संघाची मदार आहे. तर दुसरीकडे हरभजन सिंग देखील आपल्या फिरकी गोलंदाजीने समोरच्या फलंदाजांना जाळ्यात अडकवत आहे. हरभजनला साथ देण्यासाठी इम्रान ताहीर देखील आपल्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीचा वापर करत फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत आहे.

गेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने आरसीबीचा धुव्वा उडवला होता. केवळ ७० धावतच आरसीबीला आपला चंबू आवळायला लागला होता. तसे पाहता आयपीएलच्या या मोसमात भारतीय खेळाडूंवर इंग्लंड मध्ये होणाऱ्या विश्व चषकाच्या दृष्टीने पहिले जात आहे. त्यामुळे चेन्नई मधल्या अंबाती रायडूच्या स्कोर वर बीसीसीआय चे लक्ष असणार आहे.