‘संघातून धक्के मारून बाहेर निघण्यापेक्षा धोनीने आधीच निवृत्ती घ्यावी’

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद जिंकलेले आहे. त्यांची कामगिरीही दमदार राहिलेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून त्याला कामगिरीत सातत्य राखण्यास अपयश आले आहे. त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.

याविषयी भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केले आहे. गावस्कर यांनी ‘संघातून धक्के मारुन बाहेर काढण्याआधी धोनीने निवृत्त व्हावं, भारतीय क्रिकेटसाठी धोनीने मोठं योगदान दिलं आहे मात्र आता नवीन पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली आहे’ असं विधान गावस्कर यांनी केले आहे.

Loading...

तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘आता भारतीय संघ व्यवस्थापनाने धोनीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. नवोदीत खेळाडूंना आता अधिकाधिक संधी मिळायला हवी. आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार केला तर माझ्यादृष्टीकोनातून आता महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान नाहीये, टी-२० क्रिकेटमध्ये आता ऋषभ पंतलाच संधी मिळायला हवी असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महेंद्रसिंग धोनी याने आपल्या खेळीने आणि नेतृत्व गुणांनी क्रिकेट रसिकांची माने जिंकली आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली टी-२० विश्वचषक तसेच २०११ चा वनडे विश्वचषक, २०१३ चॅम्पियन ट्रॉफी, तसेच कसोटी क्रिकेट भारतीय संघाला अव्वलस्थानी पोहचवले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार