4000 धावा करणारा महेंद्रसिंह धोनी दुसरा भारतीय फलंदाज

blank

कटक: कटकमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर तब्बल 381 धावांचा डोंगर रचला. पहिले तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि युवीनं धडाकेबाज फलंदाजी केली. युवीनं दीडशतकी खेळी केली तर धोनीनंही 132 धावांची धुवाँधार खेळी साकारली. दरम्यान, धोनीनं या सामन्यात खेळताना एक नवा विक्रम रचला आहे.

 

वनडेमध्ये भारतात 4000 धावा करण्याचा विक्रम धोनीनं केला आहे. याआधी फक्त एकाच भारतीय खेळाडूला अशी किमया करता आली आहे.

 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कटकमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या 3 विकेट झटपट गेल्यानंतर युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनीनं डाव सावरला आणि द्विशतकी भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावरच टीम इंडियानं 381 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात धोनीनं खणखणीत शतक ठोकलं. एवढचं नव्हे तर धोनीनं वनडेमध्ये भारतात आपल्या 4000 धावाही पूर्ण केल्या.

 

भारतात वनडेमध्ये 4000 धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. धोनीच्या आधी भारतात 4000 हून अधिक धावा फक्त सचिन तेंडुलकरनं केल्या आहेत. सचिननं भारतात 6976 धावा केल्या आहेत. तर सचिननंतर भारतात सर्वाधिक धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानं 3406 धावा केल्या आहेत.