धोनीमुळे काैशल्यपूर्ण गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरलो

धोनी

नवी दिल्ली : आयपीएल 2021, येत्या 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. चेन्नई सुपर किंग्जला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा ट्रॉफी मिळाली आहे. या वेळी देखील  चाहत्यांना माहीकडून मोठ्या आशा आहेत. सीएसके या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पहिला सामना खेळणार आहे.  10 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने मागील हंगामातील काही खुलासे केले आहेत. ‘आयपीएलच्या मागच्या पर्वात महेंद्रसिंग धोनीने मला हळुवार यॉर्कर आणि कटर चेंडू टाकण्याचा सल्ला दिला होता. यामुळे काैशल्यपूर्ण मारा करण्यात यशस्वी ठरलो,’ असे मत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याने बुधवारी व्यक्त केले.

नटराजन म्हणाला, ‘धोनीसारख्या खेळाडूसोबत संवाद साधणे माझ्यासाठी मोठी बाब आहे. त्याने माझ्या फिटनेसबाबत जाणून घेतले, शिवाय प्रोत्साहन दिले. अनुभवासोबत आणखी उत्कृष्ट होशील. हळुवार बाऊन्सर, कटर्स आणि विविधता असलेले चेंडू टाकत जा,’ असा सल्ला दिला. हाच सल्ला माझ्यासाठी उपयुक्त ठरला.’

महत्वाच्या बातम्या