धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?

लीड्स : जो रूटचे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने तिस-या वन डे सामन्यात भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. अखेरच्या निर्णायक सामन्याचा निकाल लागल्यानंतर धोनीने एका कृतीमधून आपण वन-डे क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाणा-या धोनीने अंपायरकडून मॅच बॉल घेतला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले. धोनी निवृत्ती घेणार की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. धोनी अंपायरकडून चेंडू घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगत आहेत, तर काही चाहते धोनीने असे का केले हे समजावून सांगत आहेत.

भारतीय संघ अडचणीत असताना अनेकदा धोनीने महत्वपूर्ण खेळी केली आहे. मात्र तिस-या वन डेमध्ये त्याला तो करिश्मा दाखवता आला नाही. त्याने 66 चेंडूंत 42 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईकर शार्दूल ठाकूरने 13 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला 250 धावांचा पल्ला ओलांडून दिला.

सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीची बॅट गेले काही दिवस मैदानात शांत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा

You might also like
Comments
Loading...