fbpx

भारतीय संघव्यवस्थापनाचा मोठा निर्णय, अखेरच्या दोन सामन्यातून धोनीला वगळले

टीम महाराष्ट्र देशा- भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने 32 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत कमबॅक केले आहे. मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने भारताची आघाडी कमी केली.

मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपलं आव्हान कायम ठेवलं असताना आता पुढील सामन्यांपूर्वी भारतीय संघव्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पुढील दोन्ही वन डे सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिसऱ्या वन डेतील पराभवानंतर भारताचे सहप्रशिक्षक संजय बांगर यांनी याबाबतची माहिती दिली.

दरम्यान,पुढील दोन सामने 10 आणि 13 मार्चला होणार आहेत. धोनीच्या जागी युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला संधी दिली जाणार आहे.

2 Comments

Click here to post a comment