करोडोमध्ये कमवणारा धोनी संकटकाळात केवळ १ लाख रुपयांची मदत करतो, चाहत्यांनी घेतला समाचार

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योग-धंदे बंद असल्याने संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाला आहे. अशा काळात राज्याच्या तिजोरीवर अधिक ताण येत असतो. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक आर्थिक मदत घेऊन पुढे सरसावले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटपटूंंनीही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मदत दिली आहे. त्यात भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीने देखील अवघ्या १ लाख रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे वर्षाला करोडोमध्ये कमवणारा धोनी संकट काळात केवळ १ लाखांची मदत करत असल्याने चाहत्यांनी धोनीचा समाचार घेतला आहे.

कोरोनाव्हायरसमुळे भारतात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं आवश्यक सेवा वगळता इतर सर्व ठप्प झाले आहे, याचा थेट परिणाम मजुरीवर काम करणाऱ्यांच्या कुटुंबावर होत आहे. यासाठी सर्वक्षेत्रातील नामांकित लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहे. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने पुण्याती मजुरांसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. मात्र धोनीच्या या आर्थिक मदतीबाबत त्याचे चाहते सोशल मीडियावर नाराज झाले आहेत.

दरम्यान धोनीने केलेली मदत ही दैनंदिन वेतन मजुरांच्या कुटुंबीयांना रेशन वस्तू पुरवण्यासाठी  केली आहे. धोनीने ही रक्कम मुकुल माधव फाउंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला Crowd फंडिंग वेबसाइटच्या माध्यमातून दिली आहे. धोनीच्या पुढाकारानंतर आणखी बरेच लोक मदतीसाठी पुढे आले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांची मदत उभी करण्यात आली आहे.