‘धोनी दिल से आय लव्ह यू’, पाकिस्तानी ‘चाचा’चा माहीला खास संदेश!  

‘धोनी दिल से आय लव्ह यू’, पाकिस्तानी ‘चाचा’चा माहीला खास संदेश!  

chcha

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानचे संघ जेव्हा मैदानावर एकमेकांविरुद्ध येतात, तेव्हा केवळ खेळाडूंमधील लढाई पाहायला मिळत नाही, तर चाहतेही त्यात उत्साहाने भाग घेतात. संघाच्या विजयात चाहत्यांचा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो हे सांगण्याची गरज नाही. पण, पाकिस्तानचे काही चाहते आहेत जे काही भारतीय खेळाडूंचे खूप वेडे आहेत. असाच एक वयोवृद्ध चाहता आहे, जो पाकिस्तानचा ‘चाचा’ म्हणून प्रसिद्ध आहे, जो टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा खूप मोठा चाहता आहे. टी 20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याआधी, त्याने एकव्हिडिओ शेअर करून माहीसाठी एक खास संदेशही पाठवला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ‘चाचा’ पाकिस्तानसाठी विजयाची प्रार्थना करत आहेत आणि त्यांच्या घोषणाही देत ​​आहेत, पण धोनीवरील प्रेम लपवण्यात तो अपयशी ठरला. पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणेनंतर चाचा म्हणाले, ‘धोनी दिल से आय लव्ह यू.’ माहीसाठीचा ‘चाचा’ने दिलेला हा खास मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, धोनी एक मार्गदर्शक म्हणून टीम इंडियामध्ये परतला. भारताने 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून टी -20 विश्वचषक जिंकला.

भारत आणि पाकिस्तान टी -20 विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले आहेत आणि टीम इंडिया पाचही वेळा जिंकली आहे. क्रिकेटच्या विश्वचषकात शेजारी देश आजपर्यंत जिंकलेला नाही. इतकेच नाही तर ५० षटकांच्या विश्वचषकातही भारत-पाकिस्तान सात वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत आणि तिथेही टीम इंडियाने बाजी मारली आहे. भारतीय संघाने सराव सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून दाखवून दिली की, या स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे सज्ज आहे. भारताने प्रथम इंग्लंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाला एकतर्फी सामन्यात हरवले होते.

महत्वाच्या बातम्या