क्रिकेटमधील निवृत्तीबद्दल महेंद्रसिंग धोनी म्हणतो…

टीम महाराष्ट्र देशा : वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्याआधी महेंद्रसिंग धोनी निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती. याला खुद्द धोनीनेच पूर्णविराम लावला आहे.

Loading...

एबीपी न्यूज चॅनलच्या एका पत्रकारानं धोनीला निवृत्ती संर्दभात विचारले असता त्यानं आपल्या या वृत्ताला साफ खोडून काढले. धोनीनं आपल्या निवृत्तीवर, लोकांना वाटतं मी श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्याआधीच निवृत्त व्हावे. मात्र मी कधी निवृत्त होणार हे मलाही माहित नाही,अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे धोनी आता तूर्तास तरी निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट झाल आहे.

दरम्यान, या स्पर्धेत धोनीने लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही तसेच त्याची खेळीही संथ राहिलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत होती.Loading…


Loading…

Loading...